शरद पवारांच्या 'त्या' भाषणावर अजित पवार म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

साताऱ्याच्या सभेत भर पावसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण करून सगळे वातावरण पवारमय केले आहे. यावरच आता अजित पवार यांनी व्टीट केले आहे.

मुंबई : साताऱ्याच्या सभेत भर पावसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण करून सगळे वातावरण पवारमय केले आहे. यावरच आता अजित पवार यांनी व्टीट केले आहे.

दरम्यान, साताऱ्याच्या सभेत भर पावसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण करून सगळ्या महाराष्ट्राला भावनिक करून ही निवडणूकच पवारमय केली आहे. शुक्रवारी सायंकाळपासून साेशल मीडियावर फक्त पवार यांच्या पावसातील भाषणाचीच चर्चा सुरु आहे. यावर आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमचे भाग्य समजताे आदरणीय पवार साहेबांसारखे नेतृत्व आम्हाला मिळाले, असे व्टीट केले आहे. याची परत चर्चा सुरु झाली आहे.  

साताऱ्याच्या या सभेचे फोटो सोशल मीडियावर फाेटाे व्हायरल होताच, फेसबुकवरील प्रत्येक तिसरी पोस्ट पवारांविषयी दिसत आहे. सोशल मीडियावर पवारांचाच झंझावात आहे, विरोधक कुठेही दिसत नसल्याची सध्या स्थिती आहे. अनेक दिग्गज नेते सोडून गेल्यामुळे कमकुवत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार यांनी पुन्हा एकदा ट्रॅकवर आणले.

तसेच एवढंच नाही तर राज्यात काढलेल्या दौऱ्यातून अनेकांना आपलस केलं आहे. पवार यांना ईडीने काढलेल्या नोटीसनंतर राष्ट्रवादीने रान पेटवून बॅकफूटवर गेलेल्या पक्षाला फ्रंटफुटवर आणले आहे. आता या पावसातील भाषनाने पवारांनी रांज्याचे वातावरण पवारमय केले आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On Sharad Pawars That speech Ajit Pawar said...