Thur, Feb 2, 2023

Shardamai Pai : अध्यात्मिक गुरु वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांचे निधन
Published on : 25 January 2023, 1:13 pm
जीवनविद्या मिशनचे प्रणेते सदगुरु वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. आज दुपारी २ वाजून ९ मिनीटांनी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे प्रल्हाद वामनराव पै व कन्या मालन कामत तसेच नातू निखिल पै, स्वप्निल कामत व नातसून प्रिया निखिल पै व पणतू यश पै असा परिवार आहे. (Shardamai Pai wife of sadguru shri vamanrao pai passed away)