
मी त्यांनाही विकासाचे प्रस्क्रिप्शनसाठी शुभेच्छा देतो - थरुर
थरुर यांचा बेंचमेट होणार पंजाबचा CM; भावूक होवून दिल्या शुभेच्छा
राज्यातील पाच राज्यांच्या निवडणुकींचा निकाल हाती आला आहे. यातील पाचपैकी राज्यात भाजपाने आपला डंका वाजवला आहे. त्यामुळे आता यावर प्रतिक्रियाही येत आहेत. दरम्यान, देशात एका बाजूला भाजपाचा (BJP) विजय झाला असला तरी पंजाबमध्ये मात्र वेगळ चित्र दिसले आहे. पंजाबमध्ये आमआदमी पार्टीला बहुमत मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, आता पंजाबमध्ये मुख्यमंत्री (Punjab Aap CM) आपचाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोण मुख्यमंत्री होणार याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: 'उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणं चुकीचं'
शशी थरुर (Shashi Tharoor) यांचा बेंचमेट भगवंत मान पंजाबचा नवा मुख्यमंत्री होणार असल्याने यावर थरुर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आपच्या नविन निवडून आलेल्या यादीत १३ डॉक्टर्स देखील आहेत. मी त्यांनाही विकासाचे प्रस्क्रिप्शनसाठी शुभेच्छा देतो, असे म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP Punjab Victory) दमदार विजय मिळविला आहे. काँग्रेससारख्या (Congress) प्रस्थापित पक्षाला मागे टाकत मुसंडी मारली आहे. आपने दिल्लीत देखील प्रस्थापित पक्षांना टक्कर दिली होती. त्यामुळे 'आप'चा विजय हा राष्ट्रीय स्तरावर भाजपसाठी (BJP) धोकादायक ठरेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आप कल्याणकारी राजकारण करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. पण भाजप त्यात पारंगत आहे. आम्ही लाभार्थी एकत्र केले आहेत आणि त्यांचा पक्षावर विश्वास आहे, असे मत एका भाजप कार्यकर्त्याने व्यक्त केलं आहे.
Web Title: Shashi Tharoor Congratulate To Benchmate Bhagwant Mann Aam Aadmi Punjab New Cm
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..