Maharashtra Politics: सरकार पडेल म्हणणाऱ्या राऊतांना शिंदे गटाचा खोचक टोला; म्हणे, "अहो, तुमचे…"

shinde Faction sheetal mhatre on sanjay raut comment on BJP raosaheb danve statement
shinde Faction sheetal mhatre on sanjay raut comment on BJP raosaheb danve statement Sakal

मुंबई : उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरू असलेला संघर्ष थांबताना दिसता नाहीये. राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार कोसळेल आणि मध्यावधी निवडणुका होतील असे भाकित अनेकांकडून वर्तवले गेले. यातच संजय राऊतांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत दोन महिन्यात सरकार पडणार असे असं विधान केलं, यावर शिंदे गटाकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, "रावसाहेब दानवे कधी कधी खरं बोलतात. दानवे यांच वक्तव्य म्हणजे मध्यावधी निवडणूक. २ महिन्यात बदल होतील हे दानवेंच्य वक्तव्य खरं. बदल होतील म्हणजे सरकार पडणार असे त्यांना म्हणायचं आहे" असे विधान केले होते. त्यानंतर

हेही वाचा- गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका कार्यक्रमात बोलताना, "महाविकास आघाडीचं सरकार जाईल असं कुणालाही वाटत नव्हतं. मात्र, अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळलं. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा", असं म्हटलं होतं.

shinde Faction sheetal mhatre on sanjay raut comment on BJP raosaheb danve statement
Nikhil Khadse Death : निखिल खडसेंची आत्महत्या की हत्या? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

त्यानंतर राऊतांनी दोन महिन्यात हे सरकार कोसळेल असं भाकित केलं. यानंतर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी राऊतांच्या जुन्या विधानाची आठवण करून देत खोचक ट्विट केलं आहे.

"राज्य सरकार दोन महिन्यांत पडेल – संजय राऊत. अहो, तुमचे आघाडी सरकार २५ वर्षं चालेल म्हणाला होतात. एका रात्रीत ते कसं कोसळलं माहीत आहे ना?" शितल म्हात्रे म्हणाल्या आहेत.

shinde Faction sheetal mhatre on sanjay raut comment on BJP raosaheb danve statement
Missing Girls : बेपत्ता मुली, महिलांच्या शोधासाठी महिला आयोग आक्रमक; पोलीस महासंचालकांना दिले निर्देश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com