गुजरातला प्रकल्प देणारे शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रद्रोही; राष्ट्रवादीची सडकून टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gujrat

गुजरातला प्रकल्प देणारे शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रद्रोही; राष्ट्रवादीची सडकून टीका

मागील काळात चार ते पाच प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्य सरकारवर विरोधकांकडून टीकास्र सोडलं जातंय. परंतु आज केंद्र सरकारने एक घोषणा करुन महाराष्ट्रात दोन हजार कोटींचा प्रकल्प येणार असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.

पुण्यातल्या रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा त्यांनी केली. सीडॅकचा इलेक्ट्रॉनिक डिझायनिंग प्रकल्प रांजणगावमध्ये येणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून २ हजार कोटींची गुंतवणूक आणि ५ हजार रोजगार उपलब्ध होतील, असा दावा केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे. त्यावर राष्ट्रवादीकडून या प्रकल्पावर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपेयांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ट्विट करत निशाना साधला आहे.

हेही वाचा: Aditya vs Fadnavis : कोण खरं कोण खोटं? तिन्ही प्रकल्पासंदर्भात दोघांनीही सादर केले पुरावे

ट्विटमध्ये म्हणाले की "वेंदाता फाॅक्सकाॅन, ब्लक ड्रग, एअरबस, सॅफ्रन असे जवळपास २ लाख कोटींच्या वर प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यावर केंद्राने मोठे 2000 कोटी चे प्रकल्प देऊन महाराष्ट्राची बोळवण केली आहे. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला", मात्र महाराष्ट्रातील प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेवून महाविकास आघाडीवर खापर फोडलं आहे. तर आमच्याविरोधात वेगळ्या प्रकारचे षडयंत्र तयार केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.