Eknath Shinde | शिंदे गटातील ८ मंत्र्यांवर अतिरिक्त खात्यांची जबाबदारी; कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? घ्या जाणून

शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे
Eknath Shinde
Eknath Shindeesakal

राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास महिना उलटल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर आता शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.(Shinde Group 8 Ministers Got Additional Responsibilities Of Another Ministry From The Cm Dpj)

आजपासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर केवळ १८ मंत्र्यांचेच खातेवाटप करण्यात आलं आहे. दरम्यान, अधिवेशन सुरु होण्याअगोदरच शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे या अतिरिक्त खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोणत्या मंत्र्याकडे कोणते अतिरिक्त खाते?

उदय सामंत – माहिती आणि तंत्रज्ञान

शंभूराज देसाई- परिवहन

दादा भूसे- पणन

संजय राठोड- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

तानाजी सावंत- मृद व जलसंधारण

अब्दुल सत्तार – आपत्ती व्यवस्थापन

दीपक केसरकर- पर्यावरण व वातावरणीय बदल

संदीपान भुमरे- अल्पसंख्याक व औकाफ

30 जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, यानंतर 39 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये शिवसेनेचे 9 आणि भाजपच्या 9 अशा एकूण 18 मंत्र्यांच्या शपथविधी झाला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर 14 ऑगस्टला खातेवाटप जाहीर करण्यात आलं. या खातेवाटपानंतर शिवसेनेचे मंत्री नाराज झाल्याची चर्चा झाली, पण या मंत्र्यांनी ही चर्चा फेटाळून लावत आम्ही नाराज नसल्याचं स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com