Aaditya Thackeray| आदित्य ठाकरेंवरच्या पोस्टरवर 'दिशा' का बोल्ड ? सोशल मिडियावर चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray Disha Patani

आदित्य ठाकरेंवरच्या पोस्टरवर 'दिशा' का बोल्ड ? सोशल मिडियावर चर्चा

आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. सत्ताधाऱ्यांनी आजही विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांविरोधात घोषणाबाजी केली आहे. आज सत्ताधाऱ्यांनी थेट आदित्य ठाकरेंवर व्यक्तिगत टोलेबाजी केली आहे. 'युवराजांची कायमच दिशा चुकली', असं पोस्टर झळकवत आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल करण्यात आला. विशेष म्हणजे पोस्टरमध्ये त्यांनी दिशा या शब्दाला बोल्ड केलं आहे.(Shinde Group And Bjp Mlas Protest Against Mva With The Poster Of Aaditya Thackeray Disha Patani)

हेही वाचा: युवराजांची दिशा चुकली, सत्ताधाऱ्यांचा पोस्टरमधून आदित्य ठाकरेंवर निशाणा

आज विधीमंडळाच्या पायरीवर आदित्य ठाकरे यांचं पोस्टर हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी 'युवराजांची कायमच दिशा चुकली', असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. सत्ताधाऱ्यांनी राजकीय पटलावरुन आदित्य यांच्यावर निशाणा साधला असला तरी पोस्टर पाहता राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा रंगली आहे.

सत्ताधाऱ्यांनी पोस्टरमध्ये दिशा या शब्दाला बोल्ड केल्याने आदित्या ठाकरेविरोधातील पोस्टरबाजीवा वेगळं वळण लागलं आहे. आदित्य ठाकरेंवर व्यक्तिगत टोलेबाजी केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसेना आमदार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव अनेकदा बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीसोबत जोडलं गेलं आहे. हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र असून अनेकदा त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुलाखतींमध्येही अनेकदा या दोघांना एकमेकांविषयी प्रश्न विचारले गेले आहेत.

हेही वाचा: Maharashtra Monsoon Session Live : आम्ही कंत्राटी आहोत की पर्मनंट ते कळेल; भरत गोगावलेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

एका मुलाखतीमध्ये दिशाने “आदित्य माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्या कामावर मला खूप विश्वास आहे. सध्या देशाला एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि आदित्यसारखा तरुण नेता महाराष्ट्राला मिळाला ही खूपच चांगली गोष्टी आहे.” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

इतकेच नव्हे तर दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याचे त्यांच्या डिनर डेटीचीदेखील चर्चा रंगली होती.

Web Title: Shinde Group And Bjp Mlas Protest Against Mva With The Poster Of Aaditya Thackeray Disha Patani

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..