Uddhav Thackeray, Devendra Fadnavis and Eknath Shinde
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis and Eknath Shinde

शिंदे गट लढवणार भाजपच्याच तिकीटावर निवडणूक ? ठाकरेंच्या दाव्यावर केसरकर म्हणाले...

Published on

मुंबई - राज्याच्या सत्तांतराच्या केंद्रस्थानी राहिलेल्या गुवाहाटीचं स्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांच्यासाठी वेगळंच आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षाचे आमदार आणि खासदार सहकुटुंब आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. मात्र शिंदे गटाच्या दौऱ्यावर ठाकरे गटाने कडाडून टीका केली. त्याला शिंदे गटानेही उत्तर दिलं आहे. (Shinde group will contest election on BJP's ticket says Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis and Eknath Shinde
Bacchu Kadu : ठाकरेंनी चोळलं बच्चू कडूंच्या जखमेवर मीठ; म्हणाले आम्ही तर मंत्री...

उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने चाळीस रेडे म्हणा किंवा चाळीस गद्दारी त्यांना प्रश्न विचारतो. तुमच्यात जर अजूनही मर्दानगी शिल्लक असेल तर जाहीर सांगा की आम्ही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार नाही. गद्दारांना नाव बाळासाहेबांचं पाहिजे, चेहरा बाळासाहेबांचा पाहिजे. शिवसेनेचं नाव पाहिजे आणि मोदींचा आशीर्वाद पाहिजे. मग मेहनत कुठे आहे तुमची? असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis and Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्याला 4 मंत्री, 2 आमदारांची दांडी; चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे यांच्या प्रश्नाला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, आम्हाला भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवायची असती तर आम्ही शिवसेना सोडून गेलो नसतो. आमच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत होते. आम्हाला सहज भाजपमध्ये जाता आलं असतं. आम्ही आमची आमदारकी धोक्यात घातली याचा विचार जनतेने करायला हवा, असंही केसरकर म्हणाले.

केसरकर म्हणाले की,आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसोबत आहे. कारण बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली. बिहारसमोर लोटांगण घालणाऱ्यांनी शिवसेना निर्माण केली नव्हती, असंही केसरकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com