शिवजयंती 2021 विशेष: शिवाजी महाराजांच्या काळातील मोठ्या ऐतिहासिक घटना

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 19 February 2021

महाराजांच्या इतिहासातील पराक्रमात रमताना शत्रुशी लढताना वापरलेले गनिमी कावे, साहस यासोबतच परस्त्रीला मातेप्रमाणे मानावे, याची शिकवण देणाऱ्या घटना वाचायला मिळतात.

जगभरात अनेक पराक्रमी राजे होऊन गेलेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा राजेशाही थाट इतरांपेक्षा खूप वेगळा होता. रयतेचं स्वप्न उराशी बाळगून जगणाऱ्या व्यक्तीमत्वांमध्ये त्यांचं नाव घेतले जाते. महाराजांच्या इतिहासातील पराक्रमात रमताना शत्रुशी लढताना वापरलेले गनिमी कावे, साहस यासोबतच परस्त्रीला मातेप्रमाणे मानावे, याची शिकवण देणाऱ्या घटना वाचायला मिळतात. शिवजयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊयात शिवकालीन इतिहासातील घटनाक्रम 

'भारतमातेच्या महान सुपुत्राला नमन'; PM मोदींनी शिवजयंतीनिमित्त शेअर केला VIDEO

  • 19 फेब्रुवारी 1630 - शिवाजी महाराजांचा जन्म पुण्यातील शिवनेरी येथे झाला. सातवर्षानंतर 1637 मध्ये  जिजाऊंनी शिवरायांना पुण्यात आणले. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी निंबाळकर घराण्यातील सईबाई यांच्यासोबत महाराजांचा विवाह झाला. 
  • 27 एप्रिल 1645 - पुणे जिल्ह्यातील रोहिडा, रायरेश्वर, पठारावरील शिवमंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. 
  • 28 जानेवारी 1645 - आऊसाहेब यांच्या मालकीचे असणाऱ्या पुण्यापासून नऊ कोसावर असलेल्या रांझे गावच्या पोलिस पाटलाने महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार राजेंच्या कानी पडला. बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर हा दोषी आढळल्यावर त्याला चौरंग करण्याची शिक्षा देण्यात आली होती. पाटीलकी तर गेलीच पण हात-पाय कलम करण्याची शिक्षा देऊन शिवरायांनी स्वराज्यात महिलांवरील अत्याचार माफ केला जाणार नाही, असा कठोर संदेशच त्यावेळी दिला होता, अशी इतिहासात नोंद आहे. 
  • 7 मार्च 1647 - कानंद खोऱ्यातील तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेला सुरुवात झाली. याच वर्षी  कोंढाणाही जिंकला. विजय आणि मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून शिवरायांनी त्याचे नाव राजगड असे ठेवले. रायगड ही राजधानी होण्यापूर्वी तब्बल 26 वर्षे राजगड ही मराठा साम्राज्याची राजधानी होती.  
  • इ.स. 1648 मध्ये पुरंदर किल्ला जिंकला. त्यानंतर एका वर्षांनी जिंजी येथून शहाजी रावांची आणि कान्होजी जेधेंची सुटका करण्यात आली.
  • इ.स. 1656 -  हे वर्ष शिवरांयांसाठी खूपच यातना देणारे होते. त्यांचे ज्येष्ठ बंधू त्यांचे जेष्ठ बंधू संभाजीराजे यांचे कनकगिरी येथे तोफेचा गोळा लागून निधन झाले
  • 14 मे 1657- महाराणी सईबाईच्या पोटी शंभूराजांचा जन्म.
  • 10 नोव्हेंबर 1659 - अफजलखान वध.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथांनी समृद्ध झालेल्या इतिहासात अफझलखान वधाती घटना खूप मोठी आहे. मोठ्या शिताफीनं मोहिम फत्ते करणाऱ्या महाराजांनी अफझलखानाचा सामना चतुराईनं केला होता. प्रतापगडाच्या पायथ्याला शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची भेट झाली होती. शत्रूला शह देत महाराजांनी हिंदू साम्राज्यावर आलेलं संकटाला संपवले होते. 
  • 6 जून 1674 - शिवरायांचा राज्याभिषेक याच वर्षी शिवरायांना घडवणाऱ्या जिजाऊंचे 17 जून 1674 रोजी वयाच्या 77 वर्षी निधन झाले.  
  • 3 एप्रिल 1680 - शिवरायांचे निधन

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Jayanti 2021 chhatrapati shivaji maharaj incident of shivkalin history