
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या पराक्रमाने, नेतृत्वाने आणि प्रजाहितदक्ष राजवटीने भारताच्या इतिहासावर अमीट ठसा उमटवला आहे. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर आणि संपूर्ण देशात उत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यासाठी आणि प्रेरणादायी विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी आम्ही काही खास शिवजयंती संदेश आणि कोट्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.