"हिंदुत्वाची शिडी करून वर चढलेले इंग्रजांची नीती अवलंबू शकतात"

मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात हा पार पडलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Team eSakal

मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात आज शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो आहे. दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा सोहळा यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर षण्मुखानंद सभागृहात कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या कार्यक्रमाकडं सर्वांचं लक्ष लागून होतं. आता उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असून, त्यांनी आपल्या ठाकरे शैलीतून टीकास्त्र सोडल्याचं दिसतं आहे.

फोडा आणि राज्य कराची नीती

हिंदूत्वाची शिडी वापरून जे वर चढले ते आता फोडा आणि राज्य कराची नीती वापरु शकतात असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या राजकारणावर टीका केली आहे. मराठी-अमराठी वेगळं करती, जाती पातीच्या भिंती उभ्या करतील आणि स्वत: सत्तेची गाजरं खातील असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. तसंच सत्तेची नशा हे देखील एखादं व्यसन असल्यासारखंच आहे असा टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपला लगवाला.

मुंबईत लष्कराचं संग्रहायल तयार करणार

स्वातंत्र्य युद्धात सैनिक ज्या पद्धतिनं लढले, आज प्रतिकूल परिस्थितीत सैनिक देशासाठी लढत असतात, त्यांचं काम समजण्यासाठी अद्ययावत संग्रहालय तयार करण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

ड्रग्ज प्रकरणांतून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न

गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी करोडो रुपयांचा अमली पदार्थांचा साठा सापडला, मात्र फक्त महाराष्ट्रातच हे सगळं सापडतं असं दाखवत महाराष्ट्राला बदनाम करायचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फक्त महाराष्ट्रातच ड्रग्ज सापडतात का? गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर ड्रग्ज सापडले त्यांचं काय झालं असाही प्रश्न ठाकरे यांनी यावेळी विचारला आहे.

स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नाही पण भारत माता की जय ओरडायचं.

आपल्या या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर देखील निशाणा साधला. ते आज स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गांधींबद्दल बोलता आहेत, त्यांना हे महात्मे कळले का? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राजनाथ सिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या विधानावर टीका केली. तसंच मी झोळी घेऊन निघायला फकीर नाही, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला.

"माय मरो अन् गाय जगो हे आमचं हिंदूत्व नाही."

बाबरी मशिद प्रकरणानंतर सर्वजण घरात लपून बसले होते. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा समोर येऊन गर्व से कहो हम हिंदू है अशी घोषणा दिली होती असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून दिली. तसंच १९९२ साली झालेल्या दंगलीत शिवसैनिकांमुळेच मुंबई वाचली असंही ते पुढे म्हणाले. हिंदूत्वावर बोलताना 'आमचं हिंदूत्व हे माय मरो पण बाप जगो असं हिंदूत्व नाही' असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर टीका केली.

"लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना मारलं"

लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांना मारल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मोहन भागवत यांच्या 'सर्वांचे पूर्वज हिंदू असल्याच्या' विधानाची आठवण करून देताना उद्धव ठाकरे यांनी लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणं मोहन भागवतांना पटलं का? शेतकऱ्यांचे पूर्वज हिंदू नाही का असा प्रश्न देखील विचारला.

Uddhav Thackeray
'स्वत:मध्ये धमक असेल तर आव्हान द्या; ईडी, सीबीआयच्या जीवावर नको'

ईडीवर, सीबीआयच्या छापेमारीवर टीका

गेल्या काही काळापासून राज्यात सुरू असलेल्या ईडी आणि तत्सम केंद्रीय यत्रणांच्या धाडींवर देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी टीका केली आहे. अंगात धमक असेल तर अंगावर या असं म्हणत त्यांनी ही टीका केली. यावेळी त्यांनी मिश्कीलपणे हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली. हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपुर्वी भाजपमध्ये खूश असल्याचं विधान केलं होतं, त्यावर उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रीया दिली.

Uddhav Thackeray
मी मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं नाही, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

देवेंद्र फडवीसांवर निशाणा

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली असून, बऱ्याच दिवसानंतर असा संवाद साधता येतोय याचा आनंद असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. आपण मुख्यमंत्री झाल्याचा मोठेपणा कधीच नसून मी तुमच्यातलाच एक असल्याचं म्हणत भाषणाला सुरूवात करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'पुन्हा येईन पुन्हा येईन' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शस्त्रपुजन केलं. यापुर्वी एक चित्रफित देखील सादर करण्यात आली. या चित्रफितीमधून शिवसेनेनं केलेल्या कामांची माहिती देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com