युतीच्या घोषणेपूर्वीच शिवसेनेकडून आणखी 3 उमेदवार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

भाजप-शिवसेना युतीचा संभ्रम अद्याप कायम असून, शिवसेनेने आपल्या विद्यमान आमदारांसह काही उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करून भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी चौदा जणांना एबी फॉर्म दिल्यानंतर आजही तीन जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई : भाजप-शिवसेना युतीचा संभ्रम अद्याप कायम असून, शिवसेनेने आपल्या विद्यमान आमदारांसह काही उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करून भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी चौदा जणांना एबी फॉर्म दिल्यानंतर आजही तीन जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेनेकडून नाशिक जिल्ह्यातील तीन मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये दिंडोरीतून माजी आमदार धनराज महाले, इगतपुरीतून निर्मला गावित तर नांदगाव मधून सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजप-शिवसेनेमध्ये जागावाटपाच्या अनेक बैठका झाल्या असताना युतीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. पितृपक्ष संपल्यानंतर युतीची घोषणा होणार, असे सांगितले जात असताना ती लांबणीवर पडल्याने भाजप-शिवसेना युतीचा तिढा सुटलेला नाही. तरीही, येत्या दोन दिवसांत केव्हाही युतीची घोषणा होऊ शकते, असे दोन्ही पक्षांच्या गोटातून सांगितले जात आहे. विधानसभेच्या 288 जागांसाठी 21 ऑक्‍टोबरला मतदान असून, अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. जागावाटपात भाजपने शिवसेनेला जागा सोडताना घटकपक्षाला 18 जागा सोडण्याची भूमिका घेतली आहे. 120 जागा शिवसेनेला सोडण्यास भाजप तयार आहे. तर, 150 जागा भाजप लढणार आहे, असे भाजपच्या वतीने सांगण्यात येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena has announced 3 more candidates before the announcement of the alliance