शिवसेना आमदारांच्या बंडाचे नेमके 'हे' आहे कारण! भाजपच्या मदतीशिवाय आमदारकी अशक्य

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शिवसेनेकडे ५६ आमदारांचे संख्याबळ होते. पण, सध्या ५५ आमदारांपैकी तब्बल ४१ आमदारांनी पक्षाविरूध्द बंडखोरी केली आहे.
Former Chief Minister Devendra Fadnavis letter to Chief Minister Udhav Thakare
Former Chief Minister Devendra Fadnavis letter to Chief Minister Udhav ThakareSakal



सोलापूर : भाजपसोबत सत्ता स्थापन करता आले नसल्याने शिवसेनेने परंपरागत विरोधातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसोबत घरोबा केला. पण, अडीच वर्षांत शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीच्याच पालकमंत्र्यांना व आमदारांना सर्वाधिक निधी मिळाला. त्यातून राष्ट्रवादीने शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्याच आव्हान उभे केले. आगामी निवडणुकीत विजयाची शाश्वती नसल्याने एकनाथ शिंदेंच्या बरोबर जाऊन तब्बल ४२ आमदारांनी बंडखोरी केल्याची माहिती समोर आली आहे

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शिवसेनेकडे ५६ आमदारांचे संख्याबळ होते. पण, सध्या ५५ आमदारांपैकी तब्बल ४१ आमदारांनी पक्षाविरूध्द बंडखोरी केली आहे. तर शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले प्रहार जनशक्तीचे संस्थापक बच्चू कडू हेदेखील बंडखोरीत सामिल झाले आहेत. सुरवातीला पक्षप्रमुखांचा आदेश शिरसंधान मानून सर्वच आमदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. पण, अडीच वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांना भरघोस निधी मिळवून दिला. त्याचवेळी शिवसेना आमदारांना निधीसाठी संघर्ष करावा लागला. २०१९ च्या निवडणुकीत भाजपसोबत युती करून लढलेले बहुतेक उमेदवारांना विजय मिळाला. त्यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला होता. आता तेच उमेदवार शिवसेनेचा आमदार असलेल्या मतदारसंघात स्वत:चा जम बसवून आगामी निवडणुकीत आमदारकीचे स्वप्न पाहू लागले आहेत. हा डाव ओळखून त्या आमदारांनी बंडखोरीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचेही बोलले जात आहे. ‘ईडी’च्या कारवाईची पण भीती काहींना आहे, पण खरे कारण आता समोर आले आहे.

बंडखोरी केलेले ४२ आमदार


एकनाथ शिंदे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदिपान भुमरे, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, राजेंद्र पाटील-येड्रावकर, बच्चू कडू या मंत्र्यांसह प्रताप सरनाईक, शांताराम मोरे, तानाजी सावंत, शहाजी पाटील, विश्वनाथ भोईर, श्रीनिवास वनगा, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, प्रकाश सुर्वे, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, यामिनी जाधव, महेंद्र दळवी, योगेश कदम, दिपक केसरकर, प्रदीप जैस्वाल, ज्ञानराज चौगुले, बालाजी कल्याणकर, संजय शिरसाट, सुहास कांदे, लता सोनवणे, किशोर पाटील, मंजुळा गावित, चिमणराव पाटील, चंद्रकांत पाटील, प्रकाश आबीटकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय राठोड, डॉ. संजय रायमुलकर व संजय गायकवाड


भाजपसोबत जावू, अन्यथा सत्ता नकोच


आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत पक्षाला अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी भाजपसोबतच युती करावी लागेल. स्व. बाळासाहेबांचे अनेकदा भाजपसोबत पटले नाही, तरीपण त्यांनी युती तोडली नाही किंवा त्यांच्यापासून दूर जाऊन विरोधकांशी हातमिळविणी केली नाही, याची आठवणही त्या आमदारांनी करून दिली. त्यामुळे भाजपसोबत सरकार स्थापन करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडा, अशी मागणी त्या बंडखोर आमदारांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com