Shiv Sena MLA Disqualification Case: "तर ठाकरे गटाचे १४ आमदारही अपात्र ठरवले असते"; शिवसेना मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं

दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले मात्र खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता देण्यात आली तसेच भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून निवड वैध ठरवली.
Shiv Sena MLA Disqualification Case
Shiv Sena MLA Disqualification Case

Shiv Sena MLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल (बुधवार) शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या केस निकाली काढल्या. दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले मात्र खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता देण्यात आली तसेच भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून निवड वैध ठरवली. दरम्यान या निकालवर ठाकरे गटाने आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय दिला आहे.

या निकालावर मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai News in Marathi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय दिला. सर्व न्यायलयीन प्रक्रिया पार पाडून निकाल देण्यात आला आहे. तसेच ठाकरे गटाने केलीले १६ आमदार अपात्रतेची मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळली.

१६ आमदारांच्या अपात्रतेची मागणी कशी चुकीची, हे अध्यक्षांनी सांगितल. आम्ही ५४ पैकी ४० आमदार शिंदेंसोबत, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, दुसऱ्या गटात गेलो नाही. आम्ही नैसर्गित युतीत निवडून आलो असताना उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबत इच्छा विरोधात सरकारमध्ये सहभागी झालो

सरकार स्थापन करताना २ ते ३ हॉटेलमध्ये आम्हाला ठेवण्यात आलं. त्यावेळी पक्ष प्रमुखांकडे भाजप शिवसेनेचं सरकार असलं पाहिजे हे आम्ही वारंवार म्हणत होतो. विश्वप्रवक्ते ज्या मॅच फिक्सिंगचा आरोप करत आहेत ते निकाल येईपर्यंत विश्वास ठेवून होते. मात्र निकाल आल्यानंतर त्यांचा विश्वास उडाला.

Shiv Sena MLA Disqualification Case
धाकधूक वाढली! उद्धव ठाकरेंचं झालं, आता पवारांचा नंबर; 31 जानेवारीला राष्ट्रवादीचा निर्णय घेणार विधानसभा अध्यक्ष

जर मॅचफिक्सिंग असती तर १४ आमदारही अपात्र ठरवले गेले असते. ठाकरे गटाने न्यायालयात जावं. शरद पवार यांनी त्यांना बुस्टर डोस दिला आहे. मात्र आम्ही देखील न्यायालयात आमची बाजू मांडू. आमचं शिवसंकल्प अभियान सुरू आहे १४ तारखेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यात संयुक्त मेळावे घेणार आहोत, असं शंभुराज देसाई म्हणाले.

काल माझा पाहण्यात आलं की संजय राऊत (Sanjay Raut) व आदीत्य ठाकरे यांनी असंसदीय भाषेत वक्तव्य  केल आहे. त्यांच्या विरोधात हक्क भंग आणायला हवा याबाबत आमची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे देसाई म्हणाले. 

Shiv Sena MLA Disqualification Case
"जो राम का नही वह किसी काम का नही"; काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारल्यानंतर भाजपची टीका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com