अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर! 

टीम ई-सकाळ
Sunday, 29 December 2019

मुलाखतीत अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
- देवेंद्र फडणवीस यांनी कधीही लोकांना टार्गेट केलं नाही 
- मी आणि देवेंद्रजी कधीही गप्प बसणार नाही, कारणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात  आहे

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यातील ट्विट युद्ध काही थांबण्याची चिन्हे नाहीत. अमृता फडणवीस यांनी आपल्या मुलाखतीचे एक ट्विट रिट्विट करताना, पुन्हा शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. त्यावरून शिवसेनेनं अमृता फडवणीस यांना प्रत्युत्तर दिलंय. अॅक्सेस बँकेतील सरकारी कर्मचाऱ्यांची पगाराची खाती काढून घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून पुन्हा ट्विटरवर वाद सुरू झालाय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय आहे टीकेचा मुद्द?
अमृता फडणवीस यांनी इकॉनॉमिक टाइम्सला एक विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारलाच लक्ष्य केले आहे. त्या मुलाखतीचे ट्विट करून, अमृता फडणवीस यांनी पुन्हा शिवसेनेला लक्ष्य केलं. 'वाईट नेतृत्व असणं हा महाराष्ट्राचा दोष नाही. पण, त्या नेतृत्वासोबत राहणं हा, दोष असू शकतो,' असा टोला अमृता फडवणीस यांनी पुन्हा ट्विटरच्या माध्यमातून, लगावला. या ट्विटसोबत अमृता फडवणीस यांनी आपली मुलाखत शेअर केलीय. मुलाखतीत अमृता फडवणीस यांनी म्हटले आहे की, अॅक्सेस बँकेत पगाराची खाती ही माझं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लग्नाच्या आधीपासूनची आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळातच हा निर्णय झालाय. मुळात खासगी बँका ह्या भारतीय बँकाच आहेत. त्यांच्याकडे चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि त्या उत्तम सेवाही देतात. सरकारने तटस्थपणे याचा विचार करायला हवा. 

आणखी वाचा - दिल्लीवालोंसे डर लगता है : गुलझार

मुलाखतीत अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

  • देवेंद्र फडणवीस यांनी कधीही लोकांना टार्गेट केलं नाही 
  • मी आणि देवेंद्रजी कधीही गप्प बसणार नाही, कारणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात  आहे
  • जर मला लोकांच्याबाबतीत काही चुकीचं दिसलं तर, मी बोलणारच 
  • सरकारने कायम तटस्थ रहायला हवं 
  • खासगी बँका चांगली सेवा आणि टेक्नॉलॉजी देतात. 

शिवसेनेचं प्रत्युत्तर
शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटरवरून अमृता फडवणीस यांना प्रत्युत्तर दिलंय. अमृता फडणवीस यांनी सूड भावनेचा, वैर भावनेचा उल्लेख करून, त्यांनी मान्य केलंय की, अमृता फडणवीस या त्या बँकेत काम करत होत्या म्हणून, माजी मुख्यमंत्र्यांनी पगाराची खाती अॅक्सेस बँकेत नेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी जर मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा व्यवसाय होता तर, आता त्यांना लक्ष्य करण्याचा प्रश्न येतोच कोठे? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena reaction on amruta fadnavis tweet priyanka chaturvedi