राज ठाकरेंनी CM ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर शिवसेनेची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm uddhav thackeray raj thackeray

राज ठाकरेंनी CM ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर शिवसेनेची प्रतिक्रिया

मुंबई : भोंगा प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना शोधण्यासाठी राज्याच्या पोलिसांनी मोहिम राबवली आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारनं मनसेच्या कार्यकर्त्यांवर ज्या पद्धतीने कारवाई करत आहे ती अत्यंत चुकीची आहे, असं त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे. त्यांच्या या पत्रावर आता शिवसेनेची प्रतिक्रिया आली आहे. पत्रकारांशी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसेच्या पत्रावर भाष्य केलं आहे. (Shiv Sena reaction to Raj Thackeray letter to CM Thackeray)

हेही वाचा: राजद्रोहाचे खटले स्थगित होणार? सुप्रीम कोर्टानं केंद्राला दिले 'हे' निर्देश

परब म्हणाले, कुठल्याही प्रकारची आंदोलनं होतात आणि गुन्हा घडतो तेव्हा पोलीस कारवाई होतच असते. जाणूनबुजून कोणी सत्तेचा गैरवापर करत नाही. आम्हीही आंदोलनं केली होती आमच्यावरही कारवाया झाल्या होत्या. पोलीस आपल्या परीनं काम करत असतात ते अतिरेक्यांना शोधण्याचंही काम करत असतात तसेच आंदोलकांनाही ते शोधत असतात. बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगायचे की, आंदोलनाला सामोरे जात आहात तर दोन दिवस तुरुंगात रहायची तयारी ठेवा.

सत्तेचा ताम्रपटवरुन राज ठाकरेंना उत्तर

आम्ही नेहमीच म्हणतो की सत्ता कोणासाठीही कायम नसते. जेवढा वेळ ती हातात असते तोपर्यंत जनतेच्या हितासाठी काम करायचं असतं. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही आलेलं नसतं. दर पाच वर्षांनी मतदान होतं, दर पाच वर्षांनी जनता ठरवते कोणाच्या हाती सत्ता द्यायची, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत म्हणाले...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना परब म्हणाले, याबाबत सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्याबाबत लोकांची विविध मतं आहेत. या आदेशाचा नेमका अर्थ काय हे जेव्हा समजेल तेव्हा त्याचा पुढचा अर्थ लावता येईल.

Web Title: Shiv Sena Reaction To Raj Thackeray Letter To Cm Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top