esakal | दसरा मेळाव्यातील निर्बंध शिथिल! 200 शिवसैनिकांच्या उपस्थितीची हटवली मर्यादा
sakal

बोलून बातमी शोधा

cm uddhav thackeray

दसरा मेळाव्यातील निर्बंध शिथिल! 200 शिवसैनिकांच्या उपस्थितीची हटवली मर्यादा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : आज शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. त्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर न घेता तो षण्मुखानंद सभागृहात होतोय. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, दसरा मेळाव्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सभागृहातील उपस्थितीचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. कमाल 200 जणांच्या उपस्थितीची मर्यादा ठरवण्यात आली होती.

हेही वाचा: आज भगवान गडावर दसरा मेळावा, पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर कोण?

मात्र, ती आज अचानक आता हटवण्यात आली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आता 1000 शिवसैनिक उपस्थित राहू शकणार आहेत. याबाबतचं वृत्त 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने दिलं आहे. आज सायंकाळी हा दसरा मेळावा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होत आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि ईडीच्या धाडसत्राच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

loading image
go to top