Uddhav Thackeray Interview: महाराजांनी सूरत लुटली आणि मोदी शहांनी शिवसेना लुटली.. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र लुटीची आकडेवारीच सांगितली

Uddhav Thackeray Interview: "छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतमधील इंग्रजांच्या वखारी लुटल्या. त्याचा राग मोदी-शहा शिवसेनेवर आणि महाराष्ट्रावर काढीत आहेत काय?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Uddhav Thackeray Interview
Uddhav Thackeray InterviewEsakal

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये ठाकरे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्याचबरोबर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाही केली. दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत असं वारंवार उध्दव ठाकरे म्हणतात. पुन्हा एकदा त्याची री ओढत उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतमधील इंग्रजांच्या वखारी लुटल्या. त्याचा राग मोदी-शहा शिवसेनेवर आणि महाराष्ट्रावर काढीत आहेत काय?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Uddhav Thackeray Interview
Uddhav Thackeray: मोदींनी गोड बोलून ठाकरेसेनेसाठी खिडकी उघडली? उद्धव ठाकरेंनी भाजपला पाठिंबा देण्याबद्दल दिलं उत्तर

महाराजांनी सुरत लुटली आणि मोदी-शहांनी शिवसेना लुटली असं म्हणत उध्दव ठाकरे यांनी आकडेवारी सांगितली आहे. ठाकरे मुलाखतीवेळी म्हणाले, "गुजरातबद्दल माझ्या मनात आकस नाही. परंतु मोदी हे गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये भिंत उभी करताहेत आणि हा महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे की, मुंबईला भिकेला लावायचं. मुंबईच्या ज्या 90 हजार कोटींच्या ठेवी होत्या त्यातल्या आता किती एफडी तोडल्या हे त्यांचं सरकार गेल्यावर कळेलच आपल्याला. त्याची चौकशी लावू".

Uddhav Thackeray Interview
Lok Sabha Voting: मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये बिघाड, पुण्यासह, संभाजीनगरमध्ये मतदार खोळंबले

पुढे ते म्हणाले, ''या ठेवी म्हणजे मुंबईचं आर्थिक कवच होतं. कोस्टल रोड… हे स्वप्न मी अगदी अभिमानाने आणि अहंकाराने सांगेन की, मी दाखवलं… आणि माझ्या मुंबई महापालिकेने ते पूर्ण केलं. त्याचं श्रेयसुद्धा तुम्ही घेताय. आणि ‘कॉण्ट्रक्ट’साठी जवळपास एक लाख कोटींच्या कामांना त्यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. म्हणजे 90 हजार कोटी जाऊन पुन्हा 10 हजार कोटी खर्ची पडले. म्हणजे एक लाख कोटींचा खर्च. मग मुंबईच्या सफाई कामगारांना पगार कुठून मिळणार? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे. तर ही सगळी लूट करता यावी म्हणून शिवसेना फोडली असं देखील उध्दव ठाकरे यावेळी म्हणालेत.

Uddhav Thackeray Interview
Nilesh lanke: नगरमध्ये रात्रीस खेळ चाले! मतदानाच्या आधी पैशांचा पाऊस? BJPनं पैसे वाटल्याचा लंकेंचा दावा; video viral

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com