esakal | कोणी कोणाशीही हातमिळवणी केली तरी शिवसेना सक्षमच!
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

कोणी कोणाशीही हातमिळवणी केली तरी शिवसेना सक्षमच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी - राज्यात कोणी कोणाशीही हातमिळवणी केली तरी शिवसेनेला फारसा फरक पडणार नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांवर चालणारी संघटना आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना सक्षम असल्याचा विश्वास गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी येथे व्यक्त केला. शिवसंपर्क अभियानाअंतर्गत देसाई रविवारी (ता.१८) येथे होते. त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीची सध्या चर्चा आहे. त्याचबरोबर राज्यात मनसे व भाजप युतीच्या चर्चाही रंगत असल्याच्या पार्श्वभूमीवरील प्रश्नावर ते म्हणाले, राज्यात एका विचारसरणीतून शिवसेनेची स्थापना झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांवर चालणारी ही संघटना आजही तितक्याच ताकदीने उभी आहे, आजही लोकांच्या मनामनांत अधिराज्य गाजवते आहे. त्यामुळे राज्यात कुणी कुणाशी युती केली काय आणि हातमिळवणी केली तरी त्याचा शिवसेनेला कोणताही फरक पडणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारची कामगिरी अत्यंत चांगली सुरू आहे. त्यामुळे अशा चर्चांनी फरक पडणार नाही. खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा: पवार-मोदी भेटीमुळे काँग्रेस बॅकफूटवर; नव्या समीकरणाची चर्चा

शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून राज्यात १२ जुलैपासून दौरे सुरू असून ते २४ जुलैदरम्यान चालतील. त्यातून संघटनात्मक वाढ करण्यासह शिवसेनेचा विचार सर्वसामान्य लोकापर्यंत पोचविण्याचे काम केले जात आहे.

-शंभुराज देसाई, गृहराज्यमंत्री

loading image