शिवजयंतीचा वाद विधान भवनात; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरुन भाजपचा सवाल

मुनगंटीवार यांच्या प्रश्नाला अजित पवारांनी दिलं उत्तर
Ajit Pawar_Sudhir Mungantiwar_VidhanBhavan
Ajit Pawar_Sudhir Mungantiwar_VidhanBhavan

मुंबई : तारखेप्रमाणं आणि तिथीप्रमाणं हा शिवजयंतीचा वाद (Shiv Jayanti Row) आज विधानभवनात पोहोचला. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी याबाबत सरकारला सवाल विचारला. तसेच आज विधानभवनाबाहेर (Vidhan Bhavan) शिवाजी महाराजांची प्रतिमा लावून अभिवादनाची सोय करुन द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मुनगंटीवारांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात उत्तर दिलं.

Ajit Pawar_Sudhir Mungantiwar_VidhanBhavan
सत्तेत गेल्यापासून सेनेला तिथीचं विस्मरण : शर्मिला ठाकरे

मुनगंटीवार म्हणाले, "मुख्यमंत्री आज तिथीप्रमाणं शिवजयंती साजरी करत आहेत. शिवसेनेच्या काही आमदारांनी आणि भाजपच्या आमदारांनी शिवाजी महाराजांना आज अभिवादन केलं. आपण जयंतीच्या दिवशी महामानवांच्या प्रतिमा रिफ्टच्या समोर ठेवतो त्यानंतर तिथं प्रत्येक सदस्य आमदार संबंधित महापुरुषाला वंदन करतात. पण आज सरकारची भूमिका काय आहे? राज्याचे मुख्ममंत्री तीथीप्रमाणं शिवजयंती साजरी करत आहेत. तर दुसरीकडे सरकारी अधिकारी म्हणतात आम्हाला तिथी मान्य नाही. ही द्विधा मनस्थिती आहे. त्यामुळं माझी उपमुख्यमंत्र्यांनी विनंती आहे की हा प्रकार योग्य नाही" भाई जगताप यांचा दाखला देताना काँग्रेसच्या एका नेत्यानंही तिथीप्रमाणं जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं आहे, असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. तसेच तिथीप्रमाणं जर मुख्यमंत्र्यांसह शिवसेना-भाजप-सपा शिवजयंती साजरी करत असेल तर आणखी एक दिवस शिवजयंती साजरी करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

Ajit Pawar_Sudhir Mungantiwar_VidhanBhavan
राजेश क्षीरसागर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; चर्चांना उधान

मुनगंटीवार यांच्या या मागणीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "गेल्या पाच वर्षात भाजपचं सरकार असताना तिथीप्रमाणं शिवजयंतीसाठी कधीही त्यांनी शिवाजी महाराजांचा फोटो विधीमंडळात लावला नाही किंवा जयंती साजरी केली नाही. मागच्या काळात दिवंगत रामकृष्ण मोरे यांनी शिवाजी महाराजांचा जन्म हा १९ फेब्रुवारी १६३० मध्ये झाल्याचं इतिहासातील नोंदीवरुन निश्चित केलं आहे. तेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री शिवाजी महाराजांचा जन्म जिथं झाला तिथं अर्थात शिवनेरी गडावर शिवजयंती साजरी करतात. त्यामुळं सरकारच्यावतीनं शिवजयंती १९ फेब्रुवारीला साजरी केली जाते."

Ajit Pawar_Sudhir Mungantiwar_VidhanBhavan
शिवाजी पार्कवर शिवजयंती; राज ठाकरेंकडून मनसैनिकांना शपथ

पण आज राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख या नात्यानं आज शिवजयंती साजरी केली. शिवसेना पहिल्यापासून तिथीप्रमाणं साजरी करत आली आहे. आजही काही आमदारांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन आले. कुठल्याही नागरिकांना तिथीप्रमाणं करायची असेल तर ते करु शकतात. पण कारण नसताना वाद निर्माण करु नयेत. अधिकाऱ्यांनी जर यासाठी आज नकार दिला असेल तर त्यांना नियमांचं पालन करावं लागतं. शिवाजी महाराजांच्या जंयतीदिनी १९ फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी देणं गरजेचं आहे. पण शिवाजी महाराजांनी कामाला महत्व द्यायला सांगितलंय म्हणून तिथीच्या जयंतीदिनी सर्वांनी काम करणं अपेक्षित आहे, म्हणून आज सुट्टी दिली जात नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com