
महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण! छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकोटांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत (World Heritage Sites) समावेश झाला आहे. रायगड, राजगड, पन्हाळगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, सिंधुदुर्ग, साल्हेर, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यांनी आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आपले स्थान निर्माण केले आहे. या यशामुळे शिवरायांचा युद्धशास्त्रीय वास्तुकलेचा अनमोल ठेवा जगभरात पोहोचणार आहे.