
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचा जन्म विदर्भातील सिंदखेडराजा येथे झाला. त्यामुळे विदर्भ हा केवळ शिवशक्तीचा उगमस्थळ नसून, स्वराज्य स्थापनेतही त्याचा मोठा वाटा आहे. जिजाऊसाहेबांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासोबत झाल्यानंतरही विदर्भातील काही विश्वासू व्यक्ती त्यांच्यासोबत गेल्या आणि पुढे स्वराज्य स्थापनेत मोलाची भूमिका बजावली. विशेषतः नारोपंत हणमंते आणि गोमाजी नाईक पानसंबळ यांचे योगदान शिवकालीन इतिहासात अजरामर आहे.