
पाली: शिवराय ग्रुप अकोला यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने अकोल्यातून रायगड किल्ल्यावर मानाची पालखी निघते. मंगळवारी अकोल्यातून या पालखीचे पूजन करून वाजतगाजत व महाराजांचा जयघोष करत शोभायात्रा काढण्यात आली होती. या सोहळ्यात 300 शिवभक्त खासगी लक्झरी बसद्वारे रायगडाकडे रवाना झाले. गुरुवारी (ता. 5) ही पालखी पहाटे अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीमध्ये आली. यावेळी पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.