Devendra Bhuyar| मतदान केंद्रावर दोन गटात राडा; देवेंद्र भुयारांना धक्काबुक्की? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivaji Shikshan Sanstha Election 2022

Amravati: मतदान केंद्रावर दोन गटात राडा; देवेंद्र भुयारांना धक्काबुक्की?

अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुक मतदान केंद्रावर आमदार देवेंद्र भुयार यांना धक्काबुक्की झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, खुद्द भुयार यांनी माध्यमांशी बोलताना मला कोणतीही धक्काबुक्की झाली नसल्याचे म्हटले आहे.(Shivaji Shikshan Sanstha Election 2022 mla devendra bhuyar)

अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला गालबोट लागले आहे. पोलिस - कार्यकर्त्यामध्ये तुफान जोरदार बाचाबाची झाली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, देवेंद्र भुयार यांना धक्काबुक्की झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा फेटाळून लावत होणाऱ्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.

शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत राडा झाल्याचं पाहायला मिळालं. मतदान केंद्रावर पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि मोठा गोंधळ झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघाजणांना ताब्यातदेखील घेतलं आहे.

यावेळी माध्यमांनी देवेंद्र भुयार यांच्याशी संपर्क साधला असता. भुयार यांनी कोणतीही मला धक्काबुक्की झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

''सगळे ज्येष्ठ लोक आतमध्ये आहेत. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आम्हाला बाहेर जाण्यास सांगितले. आतमध्ये कोणालाच धक्काबुक्की झाली नाही. सगळं समन्वयाने सुरू आहे. दोन्ही नेते सोबत आहेत. त्यामुळे सगळं व्यवस्थित सुरू आहे. कोणताही राडा झाला नाही. अधिकाऱ्यांनी फक्त सर्वांना बाहेर थांबन्याचे आदेश दिले. तोच आवाज होता. कोणत्याही प्रकारचा राडा झाला नाही. मी आतामध्येच होतो. मी प्रतिनिधी आहे. मला कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की झाली नाही. '' असे पुन्हा एकदा भुयार यांनी स्पष्ट केलं.

शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांची ही शिक्षण संस्था आहे. शिवाजी शिक्षण संस्थेची आज निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत नऊ पदांसाठी 21 उमेदवार रिंगणात उभे आहेत. सकाळी 8 वाजेपासून या मतदानाला सुरुवात झाली आहे. हे मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. या निवडणुकीत 774 सभासद मतदान करणार आहेत. विकास पॅनल आणि प्रगती पॅनलमध्ये काटे की टक्कर होणार आहे.

Web Title: Shivaji Shikshan Sanstha Election 2022 Mla Devendra Bhuyar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Amravati