.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : नौदल दिनाचे औचित्य साधत आठ महिन्यांपूर्वी मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे विरोधी पक्ष तसेच शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्ष महाविकास आघाडीने या घटनेवरून राज्य सरकारला धारेवर धरत पुतळा कोसळल्याच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.