राज्यातील पोलिस ठाण्यांची निवड देशपातळीवर करण्याच्या उद्देशाने समितीच्या अहवालानुसार पाच पोलिस ठाण्यांची निवड विविध निकष आणि तपासणी आधारे करण्यात आली आहे.
इचलकरंजी : इचलकरंजीतील शिवाजीनगर आणि शिरोळ पोलिस ठाणे (Shirol Police Station) राज्यातील ‘सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे २०२२’ (Best Police Station 2022) म्हणून घोषित करण्यात आली. पोलिस महासंचालकांच्या मान्यतेने विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी हे २०२२ चे पुरस्कार तीन दिवसांपूर्वी जाहीर केले आहेत. यात राज्यातील आणखी तीन पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.