esakal | शिवभोजन योजनेला २६ जानेवारीचा मुहूर्त
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याच्या योजनेला २६ जानेवारी २०२० ला सुरवात होणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.

शिवभोजन योजनेला २६ जानेवारीचा मुहूर्त

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याच्या योजनेला २६ जानेवारी २०२० ला सुरवात होणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.           

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित केली होती, त्यावेळी भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले की, शिवभोजन योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूद भात व एक वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी १० रुपयांना देण्यात येईल. या विभागांतर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सक्षमीकरण करून वाजवी दरात आवश्‍यक वस्तूंची ग्राहकांना उपलब्धता करून देणार आहे.

loading image