शिवभोजन थाळी आता सीसीटीव्हीच्या निगरानीखाली

गरीब कामगार, विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न
शिवभोजन थाळी
शिवभोजन थाळीsakal

पुणे : शिवभोजन थाळीचा लाभ गरीब, कामगार, मजूर, विद्यार्थी, रुग्णांचे नातेवाईक आणि भिक्षेकऱ्यांना व्हावा. शिवभोजन केंद्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता याची तपासणी करण्यासाठी अन्नधान्य वितरण विभागाने पथके नेमली आहेत. तसेच, शिवभोजन केंद्रे आता सीसीटीव्हीच्या निगरानीखाली आली आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि महागाईच्या काळात या योजनेचा लाभ प्राधान्याने महाविद्यालयीन, इतर शहरांमधून आलेले विद्यार्थी, रुग्णांचे नातेवाईक, कामगार, मजूर, भिक्षेकरी आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना होत आहे. या योजनेचा लाभ प्रत्यक्ष नागरिकांना मिळावा, यासाठी त्यात पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न पुरवठा विभागाने सुरू केले आहेत.

शिवभोजन थाळी
ऑनलाईन पेमेंट केल्याचे भासवून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्यास अटक

अन्नधान्य वितरण कार्यालयाने शिवभोजन केंद्रचालकांना सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास सर्व शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यातून शिवभोजन थाळीच्या प्रत्यक्ष वाटपावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

शिवभोजन ॲपमध्ये सुधारणा

शिवभोजन ॲपमध्ये प्रत्यक्ष शिवभोजन केंद्राचे स्थान निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे त्या अक्षांश रेखांश व्यतिरिक्त इतर ठिकाणचे कोणतेही छायाचित्र शिवभोजन ॲपमध्ये अपलोड होत नाही. त्यामुळे एखाद्या छायाचित्रावरून ॲपमध्ये छायाचित्र अपलोड करता येणार नाही.

शिवभोजन थाळी
Ukraine Russia War Live : हजारहून अधिक रशियन सैनिक मारले; युक्रेनचा दावा

शिवभोजन केंद्रांमध्ये आढळल्या त्रुटी

शहरातील शिवभोजन केंद्राची तपासणी पाच पथकांमार्फत करण्यात येत आहे. या तपासणीमध्ये काही केंद्रांवर जेवणाचा दर्जा, स्वच्छता आणि पिण्याचे पाणी याबाबत त्रुटी आढळून आल्या. संबंधित केंद्रचालकांना नोटीस बजावून तातडीने त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील स्थिती

  • शिवभोजन केंद्रांची संख्या ५५

  • थाळी वाटप २४ लाख ६४ हजार २१३ (२६ जानेवारी २०२० ते ३१ जानेवारी २०२२)

  • जानेवारीअखेर अनुदान वाटप सुमारे ९ कोटी ५० लाख रुपये

तपासणी पथकांमार्फत सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येणार आहे. गैरप्रकार तसेच दुबार छायाचित्र किंवा फोटोवरून फोटो काढण्याचे प्रकार आढळून आल्यास संबंधित शिवभोजन केंद्र तत्काळ बंद केले जाईल. या योजनेत अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि नियमित तपासण्यांवर भर दिला जात आहे.

- सचिन ढोले, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com