Shivpremi Protest: मंत्र्यांच्या बंगल्याला किल्लांचे नावं, मग संवर्धन का नाही? शिवप्रेमी आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्र्यांच्या बंगल्याला किल्लांचे नावं, मग संवर्धन का नाही? शिवप्रेमी आक्रमक

मंत्र्यांच्या बंगल्याला किल्लांचे नावं, मग संवर्धन का नाही? शिवप्रेमी आक्रमक

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे शिवप्रेमी आणि गडप्रेमींकडून आंदोलन करण्यात येत आहे. राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता तर मग तुम्हाला शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी वेगळं महामंडळ स्थापन करावेच लागेल अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.

(Shivpremi Protest For Forts Conservation)

दरम्यान, आंदोलकांनी मंत्रालयाच्या दिशेने आगेकूच करत असताना पोलिसांनी आंदोलकांचा फौजफाटा थांबवला आहे. मंत्र्यांच्या बंगल्याला गडकिल्ल्यांचे नाव दिले आहेत पण संवर्धन जबाबदारीने का केले जात नाही असा सवाल गडप्रेमींनी केली आहे. तुम्हाला संवर्धन करता येत नसेल तर मंत्र्यांच्या बंगल्याला ही नावं का दिली आहेत असा सवाल आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला आहे.

पोलिसांकडून आदोलकांना थांबवण्यात आलं असून आंदोलकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Shivpremi Protest Mumbai Csmt Fort Conservation Demand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsFortProtest