esakal | #शिवराज्याभिषेक दिन ट्‌विटरवर देशात टॉपला
sakal

बोलून बातमी शोधा

Shivrajyabhishek day topped the country on Twitter

शिवराज्याभिषेक दिनाच्या इतिहासावर प्रकाश 
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोशल मीडियात केल्या जाणाऱ्या पोस्ट केवळ अभिवादन आणि शुभेच्छांच्या नाहीत. तर नेटकरी या माध्यमातून वैचारिक मंथन करत आहे. तर अनेक तरुणांनी शिवराज्याभिषेकाच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे थ्रेड लिहिले आहे. 

#शिवराज्याभिषेक दिन ट्‌विटरवर देशात टॉपला

sakal_logo
By
वैभव गाढवे

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे प्रत्येक मराठी माणसांसाठी जीव की प्राण आहेत. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर राज्याभिषेक झाला आणि महाराज रयतेचे राजे झाले. हा शिवराज्याभिषेक आता महाराष्ट्राचा लोकोत्सव, रयतोत्सव म्हणून ओळख पावतो आहे. हा सोहळा दरवर्षी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात नसला तरी घराघरांमध्ये आज हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. तसेच सोशल मीडियातील वातावरण देखील शिवमय झाले आहे. आज सकाळपासून शिवराज्याभिषेक हा हॅशटॅग ट्‌विटरवर ट्रेंड करत असून तो देशात सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी मुलांचा सोशल मीडियावर वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. काही काळापर्यंत व्हॉट्‌सऍप, फेसबूक यावर मर्यादित असलेली मराठी तरूणाई आता वैचारिक आणि बुद्धीजिवींचे व्यासपीठ म्हणून ओळखले जात असलेल्या ट्‌विटरचा मोठ्याप्रमाणावर वापर करू लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी नेटकऱ्यांनी सुरू केलेले हॅसटॅग देशात टॉपला राहिले आहेत. या हॅसटॅगखाली हजारो ट्विट करत नेटकऱ्यांनी या महापुरूषांना श्रद्धांजली अपर्ण केली आहे. अगदी तसेच आज शिवराज्याभिषेक हा हॅसटॅग ट्विटरवर देशात टॉपला आहे. 

आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त फेसबूक, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटरवर अक्षरश: पोस्टचा पाऊस सुरू आहे. व्हॉट्‌सऍप स्टेटसपासून डीपीपर्यंत सर्वत्र शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह आहे. विशेषत: ट्‌विटरवर शिवराज्याभिषेक हा हॅशटॅग टॉपला आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोशल मीडियात केल्या जाणाऱ्या पोस्ट केवळ अभिवादन आणि शुभेच्छांच्या नाहीत. तर नेटकरी या माध्यमातून वैचारिक मंथन करत आहे. तर अनेक तरुणांनी शिवराज्याभिषेकाच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे थ्रेड लिहिले आहे. या माध्यमातून नवीन पिढीमध्ये वैचारिक मंथन होत आहे. यानिमित्ताने शिवकालीन अनेक गोष्टी उजाडात येत आहे. अनेक शिवकालीन ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेतला जात असून हा ऐतिहासिक दस्ताऐवज नवीन पिढीसाठी मार्गदर्शन करत आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून शुभेच्छा 
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे तसेच अनेक मंत्री, आमदार, खासदार आणि विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहे. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची संकल्पनासमोर ठेवून भविष्यात काम करण्याचा निर्धार केला जात आहे. 


 

loading image