'काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावामुळेच मुख्यमंत्र्यांकडून प्रकल्पांना स्थगिती'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

महाविकास आघाडी सरकारने जुन्या विकास कामांना रद्द करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लोकांच्या खेड्यापाड्यांच्या विकासाला कात्री लावणे चुकीचे आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने मेट्रो कारशेडसारखे प्रकल्प रद्द केले आहेत.

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रकल्प थांबविणे सुरु असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने जुन्या विकास कामांना रद्द करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लोकांच्या खेड्यापाड्यांच्या विकासाला कात्री लावणे चुकीचे आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने मेट्रो कारशेडसारखे प्रकल्प रद्द केले आहेत. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपणही सरकार मध्ये होतो हे लक्षात घ्यावे, असा टोला मेटे यांनी लगावला.

शिवस्मारकाचे काम मार्गी लावण्यास सरकारने पाऊले उचलावीत, असे सांगून ते म्हणाले, "शिवाजी महाराजांना विरोध करणाऱ्या औलादी महाराष्ट्रात जन्मल्या. त्यांनी शिवस्मारकाला विरोध केला. सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयात लवकर भूमिका मांडावी. काँग्रेस राष्ट्रवादीकडून मला जास्त काही अपेक्षित नाही. पण, उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा. शिवस्मारकाचा आढावा घेत स्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर घेऊन स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. आता काँग्रेस - राष्ट्रवादीने स्मारकाच्या कामाची चौकशी करत स्मारकाचे काम मार्गी लावावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsangram Party leader Vinayak Mete targets Congress NCP on stop projects in Maharashtra