ShivSena: आदित्य ठाकरे अन् अब्दुल सत्तारांचा संघर्ष पेटणार! थेट सिल्लोडमध्येच घेणार सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abdul Sattar_Aditya Thackeray

ShivSena: आदित्य ठाकरे अन् अब्दुल सत्तारांचा संघर्ष पेटणार! थेट सिल्लोडमध्येच घेणार सभा

मुंबई : कृषीमंत्री अब्दुल्ल सत्तार यांना घेरण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं आता नवी रणनिती आखली आहे. त्यानुसार आता आदित्य ठाकरे ७ नोव्हेंबरला बुलडाणा आणि सिल्लोडला सभा घेणार आहेत. सिल्लोड हा सत्तार यांचा मतदारसंघ आहे. (ShivSena Aditya Thackeray rally will be held in Sillod Abdull Sattar Constituency)

हेही वाचा: Mumbai Crime: हॉटस्पॉट पासवर्ड दिला नाही म्हणून १७ वर्षांच्या मुलाला भोसकलं!

अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांना जे नुकसान सोसावं लागलं त्यासाठी त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून अब्दुल्ल सत्तार हे आदित्य ठाकरेंबद्दल विधानं करत आहेत. त्यामुळं आता ठाकरेंच्या सभेमुळं पुन्हा एकदा शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष पहायला मिळणार आहे.

हेही वाचा: Uday Samant: राज्यातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांची महिन्याभरात निघणार श्वेतपत्रिका; उद्योगमंत्र्यांची घोषणा

आदित्य ठाकरेंनी कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर सत्तार यांनी देखील त्यांना आव्हान दिलं आहे. "मी सिल्लोडच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, पण आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेचा राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा दिला नाही तरी मुख्यमंत्र्यांनी जर परवानगी दिली तरी आपण आठ दिवसात राजीनामा देऊ," असंही सत्तार यांनी म्हटलं आहे.