मला त्रास देऊ नका; परब-सोमय्या वादाविरोधात साई रिसॉर्टचा मालक कोर्टात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anil parab
मला त्रास देऊ नका; परब-सोमय्या वादाविरोधात साई रिसॉर्टचा मालक कोर्टात

मला त्रास देऊ नका; परब-सोमय्या वादाविरोधात साई रिसॉर्टचा मालक कोर्टात

अनिल परब किरीट सोमय्या यांच्यामुळे चर्चेत आलेल्या साई रिसॉर्टच्या मालकाने आता थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या वादात माल नाहक नोटिसा का असा सवाल या मालकाने विचारला आहे. तसंच आपल्याला बाजू मांडण्याची संधीच मिळालेली नाही, असंही त्याने म्हटलं आहे.

हेही वाचा: CM Shinde : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत का बसलो? श्रीकांत शिंदे म्हणाले, "कुठे बसायचं कुठे नाही हे..."

याप्रकरणी याचिकाकर्ते सदानंद कदम यांच्या याचिकेवर सोमवारी हायकोर्टात होणार सुनावणी होणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान विभागानं (एमओइएफसीसी) या रिसॉर्ट्सच्या मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसीमध्ये या रिसॉर्टवर कारवाई का करू नये?, अशी विचारणाही केली आहे. तसंच या रिसॉर्टकडून २५ लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : CM शिंदे दिल्लीला गेले; जाताना लेकाला राज्याचा कारभार देऊन गेले?

या सगळ्या प्रकरणात आता या नोटिशीविरोधात या रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. हा रिसॉर्ट आधी राज्याचे माजी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीचं असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे हा रिसॉर्ट सातत्याने चर्चेत होता. आताही लवकरच हा रिसॉर्ट आपण पाडणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे.

Web Title: Shivsena Anil Parab Bjp Kirit Somaiyya Sai Resorts Dapoli Mumbai High Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kirit SomaiyaAnil parab