
MH Politics: एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं, थेट सेनेच्या अस्तित्वाला आव्हान!
एकनाथ शिंदेंचं बंड आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेला गोंधळ या सगळ्याची चर्चा आता देशभरात होत आहे. शिवसेनेच्या इतिहासात सर्वात मोठा धक्का पक्षाला बसला आहे. यामुळे सेनेसोबतच पर्यायाने महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या अनुषंगाने देशभरात बैठका सुरू आहेत. (Maharashtra Politics)
भाजपच्या गोटातही खलबतांना सुरुवात झाली. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्वाचा मुद्दा पुढे करत खरी शिवसेना त्यांचीच असल्याचा दावा केला. यामुळे खरी शिवसेना कोणाची, हा पेच आता वाढला आहे. दोन्ही गटांनी कायदेशीर लढाईला सुरुवात केली आहे. त्याआधीच शिंदे गटाने त्यांच्या नव्या गटाचं नाव ठरवलंय. यासंबंधी संध्याकाळी अधिकृत घोषणा होणार आहे. (Eknath Shinde declared name of his party Shivsena Balasaheb Thackeray)
शिंदे गटाचं नाव ठरलं, अस्तित्वाची लढाई कायम
एकनाथ शिंदे यांचा गट वारंवार खरी शिवसेना आमची असल्याचं म्हणत आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये गेल्यानंतर त्यांनी हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड केली. यानंतर खरी शिवसेना कोणाची, असा प्रश्न उपस्थित होतो. आज संध्याकाळी 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे', असं या नव्या गटाचं नाव असणार आहे. पक्ष कोणाचा ही लढाई यामुळे होणार असं स्पष्ट झालं आहे.
शिंदे यांच्या गटाच्या नावात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचंही नाव आल्याने सेनेच्या गोटात नाराजी वाढली आहे. शिवसैनिकांनी ठिकठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर तोडफोड करायला सुरुवात केली आहे. आता शिवसेनेवर अधिकार कोणाचा असा प्रश्न उपस्थित होतोय.
बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी खरी शिवसेना शिंदेंच्या पाठिशी उभी असल्याचा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांना आमचा विरोध नाही. मात्र, खरं हिंदुत्व आमचं आणि शिवसेनेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Web Title: Shivsena Balasaheb Thackeray Name Of Eknath Shinde Mlas Party Maharashtra Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..