Shivsena : कदमांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा; शिवसेना नेत्याची जीभ घसरली

मुंबईतील शौचालयांमध्ये जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदम यांनी ओकली आहे असे विधान जाधव यांनी केले आहे.
Bhaskar Jadhav Ramdas Kadam
Bhaskar Jadhav Ramdas KadamSakal

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam : बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना नेत्यांमध्ये अगदी पायरी सोडून टीका केल्याचे आपल्यासर्वांनाच माहिती आहे. मात्र, रामदास कदम यांनी केलेल्या टीकेनंतर त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांची जीभ घसरली आहे. रामदास कदमांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करायला हवे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.

Bhaskar Jadhav Ramdas Kadam
Raj Thackeray : भाजप-मनसे युतीची चर्चा फिस्कटली? नागपुरात भाजपाविरूद्ध लढणार

मुंबईतील शौचालयांमध्ये जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदम यांनी ओकली आहे, असं सांगतानाच माझे वडील गेल्यानंतर अनेक नेते मला भेटायला आले. गिते, तटकरे, मुश्रीफ आले. त्यांच्या मी पाया पडलो. रामदास कदम यांच्याही पाया पडलो. त्याचा अर्थ त्यांनी वेगळा काढला. त्यांना काही वैचारिक पातळी आहे की नाही? असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला आहे. रामदास कदम यांच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे शिंदे यांनी त्यांना तात्काळ पदावरून हटवलं पाहिजे अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

Bhaskar Jadhav Ramdas Kadam
Raj Thackeray : चार भिंतीत ठरलेल्या गोष्टी आधी का नाही सांगितल्या? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

काय म्हणाले होते कदम?

दापोलीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना रामदास कदमांनी ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक पातळीवर टीका केल्या आहेत. बाळासाहेबांना वाटत असेल की सोनियांच्या नादी लागून आपला मुलगा बिघडला, असं विधान कदम यांनी केलं आहे. तसंच आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्यावरही कदमांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार आहेत, असंही कदम म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंना आपण बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे की काय, अशा शब्दांत रामदास कदम यांनी टीका केली आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे आज असते, तर सोनिया गांधींच्या नादाला लागून आपला मुलगा बिघडला, असं विधान कदम यांनी केले होते.

Bhaskar Jadhav Ramdas Kadam
पवारांनी राऊतांना वाऱ्यावर सोडलं; भाजपच्या टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्याच. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेल्याचेही कदम म्हणाले होते. आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा भरत गोगावले यांना मंत्रिपदं दिलं असतं. पण वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे यांना लगेचच कॅबिनेट मंत्री व्हायचं होतं. एवढचं कशाला, तर रश्मी ठाकरे यांचाही मंत्रिमंडळात कसा समावेश झाला नाही, याचं मला आश्चर्य वाटतं, अशी खोचक टीका रामदास कदम यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com