राज्यातून सर्वांत कमी मताधिक्याने 'या' उमेदवाराचा झाला विजय

Shivsena Candidate dilip lande win vidhansabha election by lowest margin
Shivsena Candidate dilip lande win vidhansabha election by lowest margin

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून, सर्वांत कमी मताधिक्‍याने शिवसेनेच्या दिलीप भाऊसाहेब लांडे यांनी विजय मिळविला आहे. उत्तर मुंबईतील चांदिवली मतदारसंघातून ते अवघ्या 409 मतांनी जिंकले आहेत.

दिलीप लांडे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार नसीम खान यांचा पराभव केला. याच यादीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अर्जुनी-मोरगावचे उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे यांचाही समावेश आहे. त्यांनी माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा 719 मतांनी पराभव केला, तर दौंडचे भाजपचे उमेदवार राहुल कुल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांचा 746 मतांनी पराभव केला आहे.

दरम्यान, अब की बार, 220 पार', अशी गर्जना करत निवडणुकीच्या रणांगणात महाजनादेशासाठी उतरलेल्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीला प्रत्यक्षात मात्र निसटत्या जनादेशावरच समाधान मानावे लागले. विरोधी पक्षाला जेमतेम 25 ते 30 जागा मिळतील, हा सरकारचा दावा जनतेने फेटाळून लावत कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या पदरात जवळपास शंभर जागांचे दान टाकत विजयी शतक साजरे केले असल्याने एकूण आता नेमकी काय समीकरणे उदयाला येतील हे येणारा काळच सांगेल.

पक्षनिहाय बलाबल
भाजप........105
शिवसेना...........56
राष्ट्रवादी......54
कॉंग्रेस...........44
बहुजन विकास आघाडी.........3
एमआयएम....................2
माकप....................1
जन सुराज्य शक्ती...............1
क्रांतिकारी शेतकरी पार्टी..............1
महाराष्ट्र नवनिर्माण सेना................1
शेकाप..............................1
प्रहार जनशक्ती पार्टी.................2
राष्ट्रीय समाज पक्ष............1
समाजवादी पक्ष..............2
स्वाभिमानी पक्ष....................1
अपक्ष..........13

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com