मला स्वतःहून युती तोडायची नाही : उद्धव ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

लोकसभा निवडणुकीवेळी जे ठरलं आहे, तसेच होईल. सर्व आमदारांनी एकत्र राहा आणि शांत राहा असा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी जे ठरलं ते व्हावे बाकी काही अपेक्षा नाही. भाजपने काय तो निर्णय घ्यावा. मी युती कायम ठेवण्यास तयार आहे.

मुंबई : भाजपने युती धर्म पाळावा. मला स्वतःहून युती तोडायची नाही. मी युती कायम ठेवण्यास तयार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी जे ठरलं आहे, तसेच होईल. सर्व आमदारांनी एकत्र राहा आणि शांत राहा असा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी जे ठरलं ते व्हावे बाकी काही अपेक्षा नाही. भाजपने काय तो निर्णय घ्यावा. मी युती कायम ठेवण्यास तयार आहे. पण, मला मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे. विचारांशी फारकत घ्यायला मी तयार नाही.

राज्याचा मुख्यमंत्री कोण यावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आज (गुरुवार) शिवसेनेच्या आमदारांची बैठक मातोश्रीवर झाली. मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसायचं की उपमुख्यमंत्रीपद घेऊन सत्तेत सहभागी व्हायचं याचा निर्णय होण्याची शक्यता होती. पण, शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे. मातोश्रीला पोलिस छावणीचे स्वरूप आलं होते. 

बैठकीनंतर शिवसेना आमदारांनी म्हटले आहे, की लोकसभेची युती करताना जे ठरलं होते तसेच व्हावे अशीच आमची मागणी आहे. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल. उद्धव ठाकरेंना पूर्ण अधिकार आहेत. सर्व एकत्रित राहा आणि शांत राहा असा संदेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena chief Uddhav Thackeray clears stand about alliance with BJP