मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप| shivsena chief uddhav thackeray interview shivsena crisis in maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena chief uddhav thackeray interview shivsena crisis in maharashtra

मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

राज्याच्या राजकारणाला दिवसागणिक नवे वळण मिळत आहे. शिंदे गट वेगळा झाल्यापासून शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. पक्ष आणि चिन्ह कोणाचं याबाबत न्यायालयात प्रकरण सुरु आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप केला आहे.(shivsena chief uddhav thackeray interview shivsena crisis in maharashtra)

मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली आहे. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या राजकीय घडामोंडीची त्यांनी उत्तरे दिली आहेत. माझे सरकार गेले, मुख्यमंत्री पद गेले याची अजिबात खंत नाही. पण माझी माणसं दगाबाज निघाली असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे हॉस्पीटलमध्ये असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न केला हे देखील त्यांनी मुलाखतीत सांगितले आहे.

तुम्ही इस्पितळात असताना, शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना तुमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न होत होता. असा सवाल संजय राऊतांनी मुलाखती दरम्यान विचारला असता...

ठाकरे काय म्हणाले?

त्या विषयावर बोलू का? खूप वेदनादायी आहे तो प्रकार. अशी खंत व्यक्त केली. आणि मला कुठेही त्या अनुभवातून सहानुभूती नकोच आहे. म्हणून खरं तर मी या विषयावर बोलणं टाळतो, पण तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रिया ही काय असते ते कोणत्याही डॉक्टरला विचारा. त्यात काय धोके असतात याची कल्पना मला होती. पण ती शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. माझी पहिली शस्त्रक्रिया झाली.

या पहिल्या शस्त्रक्रियेतून मी चांगला होऊन बाहेर पडलो होतो. त्यानंतर पाच-सात दिवसांनी डॉक्टर मला म्हणाले, उद्धवजी, उद्या आपल्याला जिना चढायचा आहे. त्यामुळे मी त्या मानसिक तयारीत होतो की उद्या आपल्याला जिना चढायचाय. एक एक पाऊल पुढे जायचं… सकाळी जाग आल्यानंतर जरा आळस देण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात मानेत एक ‘क्रॅम्प’ आला आणि माझी मानेखालची सगळी हालचालच बंद झाली. श्वास घेताना मी पाहिलं तर माझं पोटही हलत नव्हतं. पूर्णपणे मी निश्चल झालो होतो. एक ‘ब्लड क्लॉट’ आला होता. सुदैवाने डॉक्टर वगैरे सगळे जागेवरच होते. ज्याला ‘गोल्डन अवर’ म्हणतात, त्या ‘गोल्डन अवर’मध्ये ऑपरेशन झालं म्हणून मी तुमच्यासमोर आज इथे बसलो आहे.

त्यावेळी माझे हातपाय हलत नव्हते, बोटं हलत नव्हती, सगळ्यात मोठं टेन्शन होतं की डास चावला, मुंगी चावली तर खाजवायचं कसं? हाही एक वेगळा विचित्र भाग होता. त्या काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत आणि तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत.

आता आपले काय होणार?… तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती. ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती. मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. जेव्हा मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या हालचाली जोरात होत्या आणि त्याही पक्षाच्या विरोधात.

सडलेली पानं झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीपणा होता. ती सगळं पाणी झाडाकडुन पडत आहेत. आणि हे बघा झाडं कस उघडंबोकडं झालंय असं दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण दुसऱ्या दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो असं उदाहरण देखील त्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

Web Title: Shivsena Chief Uddhav Thackeray Interview Shivsena Crisis In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..