Rajya Sabha Election : सहाव्या जागेवर सेनेचा उमेदवार, संभाजी राजेंना पाठिंबा नाही? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajya Sabha Election

Rajya Sabha Election : सहाव्या जागेवर सेनेचा उमेदवार, संभाजी राजेंना पाठिंबा नाही?

मुंबई : सध्या सहा जागांसाठी राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) होऊ घातली आहे. सहाव्या जागेवर कोण दावा ठोकणार? असा प्रश्न होता. पण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आम्ही आमची उरलेली मतं छत्रपती संभाजी राजेंना देऊ, असं म्हटलं होतं. आता शिवसेनेकडून मात्र याउलट वक्तव्य आलं असून सहावी जागा लढणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा: राज्यसभेसाठी संभाजी राजेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा

देशात ५७ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे. शिवसेनेचे संजय राऊत, भाजपकडून पियुष गोयल, विकास महात्मे आणि विनय स७स्त्रबुद्धे, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे या सहा जागांवर निवडणूक होत आहे. पण, छत्रपती संभाजी राजेंनी राज्यसभा निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा करत सहाव्या जागेवर दावा केला आहे. सर्व अपक्ष आमदारांना त्यांनी मत देण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. तसेच प्रत्येक पक्षाकडे असलेल्या संख्याबळानुसार, भाजपचे २, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचा १ उमेदवार विजयी होईल. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एक-एक उमेदवार विजयी झाल्यानंतर त्यांच्याकडे काही मतं शिल्लक राहतात. हीच मतं छत्रपती संभाजी राजेंना देऊ, असं सूतोवाच शरद पवारांनी केलं होतं. तसेच तिन्ही पक्षांसोबत चर्चा करू असंही म्हटलं होतं. तसेच भाजप आणि शिवसेनेकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे जुळवाजुळव करून आपण सहावी जागा लढवायची असा दोन्ही पक्षांचा विचार होता. भाजप-शिवसेनेचा सहाव्या जागेवर डोळा असताना शरद पवारांनी संभाजी राजेंना पाठिंबा देऊ म्हटलं होतं. त्यानंतर आता शिवसेना आता दोन जागा लढणार असल्याची घोषणा अनिल परब यांनी केली आहे. म्हणजेच शिवसेना संभाजी राजेंना पाठिंबा देणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

Web Title: Shivsena Give 2 Candidate In Rajya Sabha Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shiv SenaRajya Sabha
go to top