esakal | उद्धव ठाकरेंना पहिला धक्का; अब्दुल सत्तार यांनी दिला राजीनामा
sakal

बोलून बातमी शोधा

Abdul Sattar

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातून अब्दुल सत्तार शिवसेनेकडून निवडून आले आहेत. काँग्रेसमधून ते शिवसेनेमध्ये गेले होते. सत्तार यांचा महाविकास आघाडीसरकार स्थापनेत वाटा होता.

उद्धव ठाकरेंना पहिला धक्का; अब्दुल सत्तार यांनी दिला राजीनामा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला पहिला धक्का बसला असून, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी झाल्यानंतर आज (शनिवार) पाच दिवस झाले अद्याप खातेवाटप झालेले नाही. खातेवाटपाला मुहूर्त मिळण्यापूर्वीच एका राज्यमंत्र्यांने राजीनामा दिल्याने मोठी नामुष्की ओढावली आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने राज्यमंत्रीपदाचा अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. मात्र, यामागे औरंगाबाद जिल्हा परिषदेतील राजकारण असल्याचे बोलले जात आहे. 

सोन्याने घेतली तब्बल 752 रुपयांची उसळी

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातून अब्दुल सत्तार शिवसेनेकडून निवडून आले आहेत. काँग्रेसमधून ते शिवसेनेमध्ये गेले होते. सत्तार यांचा महाविकास आघाडीसरकार स्थापनेत वाटा होता. मात्र, त्यांच्या नाराजीबद्दल आता उघडपणे गोष्टी समोर आले आहे. शिवसेनेमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर अनेक नेत्यांनी नाराजी दर्शविली होती. त्यामध्ये तानाजी सावंत, भास्कर जाधव, दीपक सावंत, रामदास कदम या नेत्यांची नाराजी समोर आले होती. आता या नाराजीचे रुपांतर अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यात झाले आहे.

ठाकरे सरकारचा आधारच बेईमान आहे, त्यामुळे असे अनेक राजीनामे भविष्यात पाहायला मिळतील, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तर, आज दिवसभरात अशा अनेक बातम्या पाहायला मिळतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
 

loading image