esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Anandrao adsul

शिवसेना नेते आनंदराव आडसुळांना दिलासा नाहीच

sakal_logo
By
सुधीर काकडे

शिवसेना नेते आनंदराव अडसुळांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी घेण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने अडसुळ यांना दिलासा देण्यास दिला नकार आहे. ऍंड ए. चंद्रचूड यांनी शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांचे वय व आजारपण लक्षात घेता न्यायालयाकडून दिलासा मिळावा अशी आमची प्रमुख मागणी त्यांची होती. तसेच ईडीने दाखल केलेला गुन्हा आणि सुरू असलेली कारवाई चुकीच्या पदधतीने केली जात आहे म्हणूनच सदर गुन्हा रद्द करावा हि मागणी वजा विनंती न्यायालयाकडे त्यांनी यापुर्वीच केली आहे.

अंमलबजावणी संचालनालय यांच्यावतीने असिस्टंट सॉलिसिटर जनरल श्री अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. कोर्टाने 2 आठवड्याची तारीख देत पुढील सुनावणी दिनांक 26/10/2021 रोजी घेण्यात येईल असे सांगितले आहे.

हेही वाचा: अजित पवारांच्या नातेवाईकांवर कारवाई आकस बुद्धीने नाही : आठवले

दरम्यान, सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्यांदा ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले होते. मात्र, त्याचवेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी ईडीचे अधिकारी आनंदराव अडसूळ यांना चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र, प्रकृतीचे कारण पुढे केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर परत ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याने अडसूळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

loading image
go to top