
Anil Parab Office : "...अन् काळवंडलेला मुकादम"; कंगनावरच्या कारवाईचा शिंदे गटाने वचपा काढला?
शिवसेना नेते अनिल परब यांच्या कार्यालयाचं म्हाडाकडून पाडकाम करण्यात आलं आहे. हे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा किरीट सोमय्यांकडून करण्यात येत आहे. त्यावरुन सध्या वातावरण चांगलंच तापलेलं आहे. अशातच शिंदे गटाने ठाकरे गटाला डिवचलं आहे.
शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी या कारवाईबद्दल एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये म्हात्रे म्हणतात, "अनिल परब यांच्या कार्यालयावर म्हाडाची कारवाई…काय ती तोडफोड…काय ती तडफड…काय तो सुका दम…आणि काळवंडलेला मुकादम. परब साहेब कंगना रानावतच्या ऑफिसची केलेली तोडफोड आठवते का?"
हेही वाचा - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ
दरम्यान, आता म्हाडाच्या ऑफिसच्या बाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं आहे. ठाकरे गटाने तिथे ठिय्याच मांडला आहे. तर कारवाई झालेल्या ठिकाणी आज सकाळी किरीट सोमय्या निघाले होते, त्यावेळी त्यांना पोलिसांनी अडवलं. त्यामुळे ते मागे फिरले. सकाळपासूनच ठाकरे गट सोमय्या यांच्या विरोधात आक्रमक झालेला दिसत आहे.