सरकारी कामकाजावर शिवसेनेचा बहिष्कार; एकनाथ शिंदेंची पाठ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 November 2019

ओला दुष्काळ हाताळण्यासाठी मंत्रीमंडळाच्या उपसमितीची आज बैठक बोलाविण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे या समितीचे सदस्य आहेत. एकनाथ शिंदे आज या बैठकीला आले नाहीत.

मुंबई : राज्यात ओला दुष्काळ निर्माण झाल्याची परिस्थिती असताना सरकारकडून आज (शनिवार) बोलाविलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थिती दाखवून आपली नाराजी स्पष्ट दर्शविली आहे. तसेच त्यांनी सरकारी कामकाजावर बहिष्कार टाकल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.

ओला दुष्काळ हाताळण्यासाठी मंत्रीमंडळाच्या उपसमितीची आज बैठक बोलाविण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे या समितीचे सदस्य आहेत. एकनाथ शिंदे आज या बैठकीला आले नाहीत. ते मराठवाड्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. याचा अर्थ शिवसेनेची नाराजीची भूमिका सरकारच्या कारभारात आणल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. 

सरकारी कामकाजावर शिवसेनेचा बहिष्कार असल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात अद्याप सत्तेबाबत एकवाक्यता झालेली नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री आमचाच यावर ठाम आहेत. आता शिवसेनेने सरकारी कामकाजावर बहिष्कार टाकल्याने युतीतील तणाव आणखी वाढला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader Eknath Shinde not attend government meeting