esakal | संजय राऊत यांचं नवं सूचक ट्विट, पाहा काय म्हणाले!
sakal

बोलून बातमी शोधा

RAUT.jpg

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी एक नवीन ट्विट केले आहे. ट्विट वरून त्यांनी हा टाेला काॅंग्रेसला लगावला असल्याची चर्चा सोशल मिडीयात सुरु आहे. तसेच यावरून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

संजय राऊत यांचं नवं सूचक ट्विट, पाहा काय म्हणाले!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी एक नवीन ट्विट केले आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकास लोकसभेत पाठिंबा दिला. यामुळे महाराष्ट्रात महाविकासआघाडीत असणार्य़ा काॅंग्रेसने शिवसेनेने याबाबत भूमिका स्पष्ट करावी असे सांगितले आहे. यावरच सूचक भाष्य करणारं त्यांचं ट्विट राऊत यांनी आज केले आहे. त्यांच्या ट्विट वरून त्यांनी हा टाेला काॅंग्रेसला लगावला असल्याची चर्चा सोशल मिडीयात सुरु आहे. तसेच यावरून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, सध्या महाविकासआघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार देखील सध्या रखडला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आम्हाला व इतर राज्यांना या बिलबाबत स्पष्टता आल्याशिवाय आम्ही या विधेय़कास पाठींबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

तसेच सर्वच स्तरातून हे बिल म्हणजे फक्त वोटींग बॅंकेचे राजकारण असल्याची टीका या बिलवर होत आहे. त्यामुळे आम्हाला याबाबत स्पष्टता हवी आसल्याचे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. याबाबत एक सूचक ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले आहे. एक मोठा उल्लू आणि त्याच्याशेजारी एक छोटा उल्लू बसलेला असून, राऊत यांनी such a difficult photo..first time sitting together....असा उल्लेख केला आहे.  खरंच हा फोटाे अवघड आहे. पहिल्यादांच एकमेकांसोबत बसणे कठीण जात असल्याचे त्यांनी यातून सूचविले आहे. यावरून आता परत काॅंग्रेस काय बोलते आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.