Sanjay Raut | आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut sharad pawar

'आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला'

सध्या देशभरात भारत कधी आणि कोणाच्या योगदानामुळे स्वातंत्र्य झाला यावर काहींनी वादळ उठवलंय. सेलिब्रिटींनी सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर मतं मांडून वादात तेल ओतलंय. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून भाजपला टोला लगावला आहे. 'आम्ही करेक्ट कार्यक्रम करत महाराष्ट्राला दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र केलं, आणि भगवा फडकवला,' असं विधान राऊत यांनी केलं.

कृषी कायद्यांवरूनही त्यांनी भाजपप्रणित भक्तांना टोला लगावला आहे. शिवसेनेचे नगरसेवक डी.जी. सुर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी नाशिक महापालिकेत शिवसेनेचे 100 नगरसेवक निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच विधानपरिषदेवर रामदास कदम यांचा पत्ता कट करून वरळीचे सुनिल शिंदे यांना उमेदवारी का देण्यात आली, यावरही भाष्य केलं.

शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य लढून मिळालेलं, भीकेत मिळालेलं नाही!

कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करणारा पंजाब आणि हरयाणाचा शेतकरी मागे हटला नाही. हे फक्त दोन राज्याचे शेतकरी नव्हते. हे शेतकरी संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांच प्रतिनिधित्व करत होते. अखेर सरकाराला झुकावं लागलं. तीन काळे कायदे रद्द झाले. 'हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं आहे. भीकेत मिळालेलं नाही,' असे राऊत म्हणाले.

एका वर्षापासून शेतकरी ज्या तणाव, दबाव आणि दहशतीखाली होता. त्याचं जोखड आता निघालं आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय असतं? कंगना रणौत सांगते ते स्वातंत्र्य नाही. विक्रम गोखले म्हणतात तेही नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरचं जोखड निघून जातं, फेकलं जातं. ते स्वातंत्र्य असतं, असा टोला राऊत यांनी लगावला.

loading image
go to top