Maharashtra Politics: नाशिकनंतर आता धाराशिवमध्येही सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली; शिवसेनेनं भाजपला सुनावलं

राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिव लोकसभेच्या जागेवर केला दावा
Devendra Fadnavis and Eknath Shinde
Devendra Fadnavis and Eknath ShindeEsakal

राज्याच्या राजकारणात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू झाली आहे. जागा वाटप, तयारी, दौरे, सभा यांना आता सुरवात झाली आहे. अशातच राज्याच्या सत्तेत असणारे शिवसेना-भाजप यांच्यात भाजपा आणि शिवसेना ( शिंदे गट ) यांच्यातही जागांवरून दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात झाली आहे. भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिव लोकसभा जागेवर दावा सांगितला होता. याला शिवसेना नेते आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर दिलं आहे.(Latest Marathi News)

मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने २३ जागा लढविल्या होत्या. त्या पूर्ण जागा यावेळीही आम्हीच लढवू, यावर आम्ही ठाम आहोत. आमच्या शिवसेनेला कोणी गृहीत धरू नये, असा इशाराही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी दिला.

दुसरीकडे नाशिकमध्ये देखील भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात आला. सोशल मीडियावर पोस्ट करत विद्यमान शिवसेना खासदारावर भाजप इच्छुकानं जोरदार हल्लाबोल केला आहे.

'२०२४ मध्ये धाराशिवमध्ये भाजपाचा खासदार व्हावा. आपल्या हक्काचं मोदी सरकार पुन्हा यावं. या अनुषंगाने सहकार्य करा,' अशी विनंती भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली होती. त्यावर शिवसेना नेते आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis and Eknath Shinde
BJP vs Shinde Group: भाजपच्या लेखी खासदार गोडसे ‘गद्दार’! पोस्टर वॉरमुळे वादाची ठिणगी

तानाजी सावंत माध्यमांशी बोलताना त्यांना यावर पत्रकारांनी प्रश्न केला. तानाजी सावंत यावेळी बोलताना म्हणाले की, “ही जागा शिवसेनेची आहे. चुकून त्यांच्यांकडून व्यक्तव्य करण्यात आलं असावं. कारण, शिवसेना आणि भाजपाची युती आहे. लोकसभेला आम्ही २३ ठिकाणी लढलो असून, १८ जागा निवडून आल्या. आम्ही आमच्या (शिवसेनेच्या) २३ जागांवर ठाम आहोत. निवडून आलेली किंवा पराभव झालेली एकही जागा शिवसेना सोडणार नाही.”(Latest Marathi News)

Devendra Fadnavis and Eknath Shinde
सोलापूर पोलिसांनी बनविली १०४३ गुन्हेगारांची यादी; निवडणुकीपूर्वी काहीजण होणार तडीपार व स्थानबद्ध

“धाराशिवची जागा ही शिवसेनाच लढणार आहे. कार्यकारिणी उमेदवार ठरवेल. भाजपाकडून का दावा करण्यात आला माहिती नाही. तर ही जागा २५ वर्षापासून पारंपरिक पद्धतीने शिवसेनाच लढत आली आहे. त्यामुळे २०२४ सालीही ही जागा शिवसेनेचा लढवेल,” अशा शब्दांत तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे.(Latest Marathi News)

Devendra Fadnavis and Eknath Shinde
Loksabha Election : उदयनराजेंचं टेन्शन वाढलं; 'हा' नवा पक्ष विरोधात लढणार निवडणूक, राष्ट्रवादीचंही असणार आव्हान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com