शिवसेनेचा 'या' दोन खात्यावर डोळा? मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 December 2019

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी खातेवाटप अजून झालेले नाही. याच दरम्यान आज सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी आणि जलसंपदा विभागाची बैठक बोलावली होती. या बैठकीवरून शिवसेनेचा या दोन खात्यावर डोळा असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी खातेवाटप अजून झालेले नाही. याच दरम्यान आज सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी आणि जलसंपदा विभागाची बैठक बोलावली होती. या बैठकीवरून शिवसेनेचा या दोन खात्यावर डोळा असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

दोन्ही क्षेत्रातील आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असून बैठकीला फक्त शिवसेनेचेच नेते उपस्थित होते. बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अनिल परब आदी मंडळी उपस्थित होती. महाविकासआघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकही नेता या बैठकीला उपस्थित नव्हता.

ही तर आणीबाणीची वेळ; न्यायव्यवस्थेत बदल झालाच पाहिजे 

खातेवाटप होण्यापूर्वी कृषी आणि जलसंपदा विभागाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा  घेतला असल्याने शिवसेनेचा या दोन खात्यांवर डोळा असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर २८ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जेष्ठ नेते छगन भुजबळ आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली. पंरतु आणखी कोणत्याचे मंत्र्याचे खातेवाटप मात्र करण्यात आलेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena may wants Agriculture and Water Resources ministry