खडसे बाप-लेकीकडून जीवाला धोका, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

Eknath Khadase-Rohini Khadase
Eknath Khadase-Rohini Khadasee sakal

जळगाव : महाविकास आघाडीतील दोन घटक पक्ष राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यामध्ये आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. मुक्ताईनगरमध्ये दोन्ही पक्षामध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसतंय. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (Shivsena MLA Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadase) आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadase) यांच्यावर गंभीर आरोप केले असून या बाप-लेकीपासून जीवाला धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Eknath Khadase-Rohini Khadase
जळगाव : एकनाथ खडसे, अनिल पाटील, रवींद्र पाटील बिनविरोध ?

राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी मतदारसंघातील महिला सुरक्षा नसल्याचे ट्विट केले आहे. महिलांचा अपमान केल्यास चोप देऊ, असा इशारा त्यांनी आमदार चंद्रकांत पाटलांना दिला. त्यानंतर आमदार पाटील चांगलेच संतप्त झाले आहेत. आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार त्यांनी पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. त्यामुळे मुक्ताईनगरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

आमदार पाटलांच्या आरोपावर काय म्हणाले एकनाथ खडसे? -

आमदार चंद्रकांत पाटील यांचे अनेक अवैध व्यवसाय आहेत. ते टोलवर बेकायदा पैसे वसुल करतात. याबाबत पोलिस अधिक्षकांना कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहेत. या आमदाराच्या गाडीच्या चालकाने महिलेला शिवीगाळ केली आहे. ते महिलांबाबत अंत्यत वाईट बोलले आहेत. याबाबतच्या दोन ऑडिओ क्लिप देखील पोलिस अधिक्षकांना दिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची मागणी होत आहे. त्यांना संताप येणं स्वाभाविक आहे. त्यांचे अवैध धंदे आम्ही बंद पाडल्याशिवाय राहणार नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण? -

एका महिलेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्याचा संताप आल्याने ईश्वर हटकर या व्यक्तीने संबंधित महिलेला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आम्ही पाटलांचे माणसे आहोत, असं त्यावेळी सांगितलं. रात्री साडेदहा वाजता ईश्वर हटकर घरासमोर येऊन मोठमोठ्याने शिव्या देत होता, असा आरोप महिलेने केला आहे. याचप्रकरणावरून रोहिणी खडसे यांनी आमदारांना चोप देऊ अशा शब्दात इशारा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com