esakal | खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena MP Sanjay Raut is admitted to Lilavati Hospital in Mumbai

शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दैनंदिन धावपळीमुळे आणि त्यांना असलेल्या शुगरच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दैनंदिन धावपळीमुळे आणि त्यांना असलेल्या शुगरच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

डॉ. जलील पारकर हे त्यांच्यावर उपचार करणार असून त्यांची  अँन्जिओग्राफी होणार असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तर, त्यांना आता पुढील दोन दिवस रुग्णालयात काढावे लागणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

विधानसभा निकाल लागल्यापासून शिवसेनेची सातत्याने भूमिका मांडत होते. परंतु आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने आता महत्वाच्या क्षणीच संजय राऊत हे रुग्णालयात दाखल झाल्याने शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

शिवसेना एनडीएतून बाहेर; अरविंद सावंत यांचा राजीनामा सुपूर्द 

गेल्या काही दिवसांत संजय राऊत सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत. जवळपास रोज दोन-तीन पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सत्ताधारी भाजपला घाम फोडला होता. शिवसेनेची भूमिका मांडण्याचे जबाबदारी पूर्णपणे संजय राऊत यांच्यावर होती. गेल्या पंधरा दिवसांत दग दग झाल्यामुळे राऊत यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.