Sanjay Raut : बेळगावात मराठीत भाषणाला सुरुवात करा; राऊतांचं PM मोदींना आव्हान

आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
Sanjay Raut Narendra Modi
Sanjay Raut Narendra ModiSakal

आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक आव्हान दिलं आहे. आजच्या दिवशी बेळगावात आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत करा, असं राऊत म्हणाले आहेत.

याविषयी संजय राऊतांनी ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये राऊत म्हणतात, "मोदीजी ज्या राज्यात जातात तिथे स्थानिक भाषेत भाषणाला सुरूवात करतात. आज मराठी भाषा गौरव दिनी, पंतप्रधान बेळगावात आहेत. बेळगावात मराठीत भाषणाला सुरुवात करून त्यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर मराठी जनांना अभिमान वाटेल ! कर्नाटक सरकारला एक कडक संदेश जाईल.पहा जमतंय का!"

दरम्यान, माध्यमांशी बोलताना राऊतांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार अद्याप पूर्ण न झाल्याने संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. राऊत म्हणाले, " जे मुख्यमंत्री आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकले नाही. त्यांचे सरकार वैध आहे हे कसे म्हणाल तुम्ही. त्यांना भिती आहे अपात्रतेची त्यामुळे ते विस्तार करत नाही. टांगली तलवार आहे त्यांच्या डोक्यावर अपात्रतेची. निवडणूक आयोगाने शेण खाल्ले पण आम्हाला सर्वोच्च न्यायालय आशेचा किरण आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com